भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

गुटखा माफिया तुकाराम मुंडेंच्या रडारवर, आता थेट मकोका, विक्रेत्यांचे धाबे दणाणले

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे राज्यातील गुटखा माफियांवर आता थेट मकोका अंतर्गत कारवाई होणार आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना यासंदर्भात आदेश दिले आहेत.

अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील गुटखा, तंबाखू आणि निकोटीनयुक्त पदार्थांच्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी सर्वात मोठा निर्णय घेतला आहे。आता हे प्रतिबंधित पदार्थ विकणाऱ्या संघटित गुन्हेगारांवर आणि विक्रेत्यांवर थेट मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई केली जाईल

पदभार स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढेंनी राज्यभरात कारवाया करत कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त केला असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अवैध विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

गुटखा, तंबाखू, निकोटीनयुक्त पानमसाल्याच्या अवैध वापाराला प्रतिबंध घालण्यासाठी आता अन्न व औषध प्रशासनाकडून हे मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. केवळ विक्रेतेच नव्हे तर उत्पादक, पुरवठादार, वाहतूकदारांवरही कारवाई होणार आहे. यामधून कोणाचीही सुटका होणार नाही, असा इशाराच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. गोदाम चालक आणि घाऊक तसेच किरकोळ विक्रेतेही एफडीएच्या रडावर असणार आहेत. प्रतिबंधित अन्नपदार्थांचा व्यापार आता संघटित गुन्हा मानला जाणार आहे, जर अशा अन्नपदार्थांचा व्यापार कोणी करत असेल तर त्याच्यावर आता थेट मकोका अतंर्गत कारवाई होणार आहे.

त्यामुळे आता गुटखा, तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पानमसाला तसेच तत्सम तंबाखू-मिश्रित प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्री करणाऱ्या संघटित नेटवर्क्सविरुद्ध पात्र प्रकरणांत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ म्हणजेच मकोका लागू करण्यात येणार आहे. या संदर्भातील आदेश अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी सर्व क्षेत्रीत अधिकाऱ्यांना दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!