भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण : उपजिल्हाधिकाऱ्यावर मोठी कारवाई, संबंधित अनेक अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले

नाशिक, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अनेक मोठ मोठे खुलासे बाहेर येत आहेत. यात राजकारण्यांसह अधिकारीही गुंतले असल्याचेही समोर येत असताना आता राजकारण्यांच्या नंतर शासकीय अधिकारी अडचणीत आल्याचं दिसून आलं. या प्रकरणात संबंधित आता मुंबईत उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अभिजीत भांडे पाटील या अधिकाऱ्याची बदली करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

अभिजीत भांडे पाटील यांचे अशोक खरातशी जवळचे संबंध असल्याचे उघड झाले आहे. मुंबईतील वांद्र्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण येथे उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी पदावर कार्यरत असलेल्या अभिजीत भांडे पाटील यांची प्रतिनियुक्ती लोकहितास्तव तातडीने संपुष्टात आणली आहे. त्यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणून त्यांना मंत्रालयातील महसूल व वन विभागात तात्काळ रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील यांच्यावर झालेल्या कारवाई मुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे खरातच्या संपर्कात असलेल्या इतर महसूल अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत. यासह प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या अशोक खरातमुळे रुपाली चाकणकर यांना महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला असून यांच्यासह अनेक राजकारणी अडचणीत आल्याचे समोर येत आहे. अशोक खरातच्या गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट होत आहे.या प्रकरणात कुणालाही सोडणार नसल्याचा इशारा देत संबंधित अधिकारी असोत या कुणीही असोत या सर्वांची चौकशी करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

अभिजीत भांडे पाटील हे उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असून त्यांचे अशोक खरातशी असलेले संबंध समोर आले आहेत. अशोक खरातच्या मुलीच्या आणि पत्नीच्या नावे असलेल्या जमिनीमध्ये गुंतवणूक केल्याप्रकरणी आता त्यांची अडचण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अशोक खरातशी संबंधित अनेक कामांमध्ये अभिजीत भांडे पाटील यांची गुंतवणूक असल्याचा आरोप केला जात आहे. आता त्यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर खरातशी संबंधित इतर महसूल अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

याआधी अशोक खरात प्रकरणाशी संबंध आल्यानंतर राष्टवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. रुपाली चाकणकर या अशोक खरातच्या संबंधित एका ट्रस्टच्या संचालिका होत्या. त्यामुळे या प्रकरणात आता त्यांची चौकशीही केली जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!