जळगाव जिल्ह्यात सूर्य आग ओकतोय : जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट, तापमान 45 अंशांच्या वर..
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरली असून गजबजलेले रस्ते निर्मनुष्य पाहायला मिळत आहेत. जिल्ह्यात उष्माघाताची लक्षणे जाणवणाऱ्यांच्या संख्येत सुमारे 15 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पुढील काही दिवस अशीच उष्णतेची लाट राहणार असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यात आज 12 मे रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास 45.5 अंश होती.
हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यात 14 मे पर्यंत यलो अलर्ट कायम राहणार आहे. याचा अर्थ पुढील दोन दिवस जळगावकरांना उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागणार आहे. हा आठवडाभर तरी उष्णतेचा हा कहर असाच सुरू राहील. मात्र, हवामान अंदाजानुसार 20 मे नंतर जिल्ह्यात वळीव पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 12 मे 2026 रोजीच पाऱ्याने ४५.५ अंशांचा टप्पा गाठला आहे.
हवामान स्थिती: स्वच्छ आणि कडक ऊन राहणार असून जळगाव जिल्ह्यातील पुढील 3-4 दिवस उष्णता कायम राहील आसा अंदाज आहे. दुपारच्या वेळी बाहेर पडताना काळजी घेणे आवश्यक आहे.

