सोशल मीडियावर सूत जुळलं, अन् तिने त्याच्यासाठी देश सोडला! जळगावात घुसखोर बांगलादेशी तरुणीसह प्रियकराला अटक
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव शहरात अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांविरोधात सुरू असलेल्या विशेष शोध मोहिमेदरम्यान शनिपेठ पोलिसांनी मोठी कारवाई करत एका २० वर्षीय बांगलादेशी तरुणीला ताब्यात घेतले आहे. या तरुणीला भारतात बेकायदेशीरपणे आश्रय दिल्याप्रकरणी जोशी पेठेतील एका व्यक्तीवरही गुन्हा दाखल झाला असून, दोघांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
म्हणतात, प्रेम हे आंधळं असतं. मग त्याच्यासाठी काही ही करण्याची तयारी प्रेमी युगुलांची असते. असाच एक प्रकार जळगावमध्ये घडला आहे. सोशल मीडियावरून एका २० वर्षीय बांगलादेशी तरुणीची जळगावच्या एका तरुणा सोबत ओळख झाली. पुढे ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. अशा स्थितीत कोणीका राणी शामलचंद्र राय या बांगलादेशी तरुणीने लग्नासाठी सीमा ओलांडत बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला. भारतात आल्यानंतर तिने आपला प्रियकर राहात असलेलं जळगाव गाठलं.
एक परदेशी महिला विनापरवाना जळगाव शहरातील जोशी पेठ भागात राहत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला असता, कोणीका राणी ही तरुणी आढळून आली. चौकशीदरम्यान तिच्याकडे कोणतेही वैध पासपोर्ट किंवा व्हिसा नसल्याचे निष्पन्न झाले. जळगावातील सुवर्ण कारागीर चिन्मय जगन्नाथ वाला (रा. जळगाव, मूळ रा. पश्चिम बंगाल) याच्याशी तिची सोशल मीडियावर ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर तिने थेट बांगलादेशची सीमा ओलांडून जळगाव गाठले. तिला या तरुणासोबत लग्न करायचे होते. ते दोघे ही एकत्र राहात होते.
या प्रकरणी पोलिसांनी कोणीका राणी आणि चिन्मय वाला या दोघांविरुद्ध इमिग्रेशन व परदेशी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आपण विवाह केल्याचा दावा या दोघांनी केला असला, तरी त्याबाबतचा कोणताही कायदेशीर पुरावा पोलिसांना अद्याप मिळालेला नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. जळगावचा सुवर्ण कारागीर चिन्मय आणि बांगलादेशची कोणीका यांची ओळख सोशल मीडियावरून झाली होती. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि लग्नासाठी कोणीका हिने थेट भारतात येण्याचा निर्णय घेतला. कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय तिने छुप्या मार्गाने भारतात प्रवेश केला होता. ती जळगावातील जोशी पेठ परिसरात चिन्मयसोबत राहू लागली. शनिपेठ पोलिसांनी तिला आणि तिला आश्रय देणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. शिवाय शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
