भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमफैजपूरयावल

फैजपूर सह पाडळसे येथील दोन १९ वर्षीय तरुणी बेपत्ता ; अपहरणाचा संशय

फैजपूर. मंडे टु मंडे न्युज. प्रतिनिधी || फैजपूर शहरासह पाडळसे गावातील दोन १९ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दोन्ही प्रकरणांमध्ये अज्ञात व्यक्तींनी आमिष दाखवून फूस लावत तरुणींना पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

फैजपूर शहरातील तरुणी बेपत्ता

फैजपूर शहरातील महात्मा गांधी हॉल परिसरात राहणारी १९ वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे. अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवून फूस लावत पळवून नेल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी पोलिसांत दिली. या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिल पाटील करीत आहेत.

पाडळसे येथील तरुणीही बेपत्ता

दुसऱ्या घटनेत पाडळसे येथील १९ वर्षीय तरुणी भुसावळ येथे महाविद्यालयात जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली. मात्र, ती घरी परतली नसल्याने कुटुंबीयांनी तिच्या बेपत्ता होण्याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून फूस लावत तरुणीला पळवून नेले असावे, तसेच तिला कुठेतरी डांबून ठेवल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपासही सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विकास सोनवणे करीत आहेत.

दोन्ही घटनांमुळे परिसरात चिंता व्यक्त होत असून, बेपत्ता तरुणींचा शोध घेण्याचे आणि प्रकरणांचा तपास करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!