वडगाव-विवरे दरम्यान गुटख्याने भरलेल्या वाहनाची मूर्ती वाहून नेणाऱ्या चाचेसला धडक
सावदा. ता. रावेर.मंडे टु मंडे न्युज ||रावेर तालुक्यातील वडगाव-विवरे : दुर्गामातेची मूर्ती घेऊन जाणाऱ्या चोपडा येथील मंडळाच्या चाचेसला गुटख्याने भरलेल्या चारचाकी वाहनाने धडक दिल्याची घटना आज सकाळी वडगाव-विवरेदरम्यान घडली. या अपघातामुळे काही काळ घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, MH 26 V 4423 क्रमांकाचे फोरव्हीलर वाहन बऱ्हाणपूरहून सावद्याच्या दिशेने येत होते. या वाहनाने दुर्गामातेची मूर्ती घेऊन जाणाऱ्या चोपडा मंडळाच्या चाचेसला धडक दिली.
विशेष म्हणजे, धडक देणाऱ्या वाहनामध्ये विमल गुटख्याचा मोठ्या प्रमाणात साठा भरलेला होता. त्यामुळे या वाहनातून गुटख्याची वाहतूक केली जात होती, तसेच हा साठा कुठे नेला जात होता, कोणाचा? याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.बऱ्हाणपूर (मध्यप्रदेशातून ) गुटख्याची मोठ्या प्रमाणावर रावेर मार्गे वाहतूक केली जाते.
अपघाताची माहिती मिळताच संबंधितांनी घटनास्थळी धाव घेतली. गुटख्याच्या साठ्याबाबत तसेच अपघाताच्या कारणाबाबत संबंधित यंत्रणेकडून तपास केला जाणार का? त्यावर कायदेशी कारवाई केली जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या अपघातात काही जण जखमी सुद्धा झाल्याची माहिती मिळत असून या अपघातात नेमके किती नुकसान झाले याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.


