मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत नायगाव येथे महिला उद्योजकता कार्यक्रम संपन्न
नायगाव.ता. मुक्ताईनगर. मंडे टु मंडे न्यूज. विठ्ठल कोळी ||
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत महिला बचत गटातील महिलांना उद्योजकतेच्या माध्यमातून स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने नायगाव येथे महिला उद्योजकता कार्यक्रम नायगाव ग्रामपंचायत च्या माध्यमातून उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमात सुरवातीला दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांना भाव पूर्ण श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्र संत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा, व सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमे चे पूजन करून” हीच आमची पार्थना हिच आमचे मागणे “ही प्रार्थना घेतली गेली.आलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.त्या नंतर नायगाव ग्रुप ग्रा. पं. अधिकारी रवींद्र मोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. तर शिवदास राठोड. नायगाव प्रशासक यांनी मनोगत व्यक्त केले
महिला बचत गटातील महिलांना विविध व्यवसायांच्या संधी, उद्योग उभारणी, आर्थिक नियोजन, उत्पादनांची विक्री व बचत गटाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती याविषयी प्रमुख मार्गदर्शक विजय कोळी सर व सचिन पाटील सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. महिलांनी केवळ बचतीपुरते मर्यादित न राहता उद्योग-व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
महिला बचत गट हे ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचे महत्त्वाचे माध्यम आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळत असून, त्यातून कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते. महिलांनी एकत्र येऊन विविध उद्योगांमध्ये पुढाकार घेतल्यास गावाच्या विकासालाही चालना मिळू शकते, असा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला.


