Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

फैजपूरयावल

फैजपूर नगरपरिषदेत वार्षिक फंडातून अडीच कोटीचे कामे संशयापद : नगरसेविका सुमय्या बी शे कुर्बान यांचा आरोप

फैजपूर.मंडे टु मंडे न्युज || नगर परिषदेच्या नपा फंडातून तसेच वार्षिक निविदा प्रक्रियेद्वारे करण्यात आलेल्या विविध विकासकामांची सविस्तर माहिती मिळावी, यासाठी नगरसेविका सौ. सुमय्या बी. शेख कुर्बान यांनी आज, दिनांक ९ ऑक्टोबर २०२६ रोजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे यांच्याकडे लेखी अर्ज सादर केला.


या अर्जाद्वारे दिनांक १ जानेवारी २०२६ पासून अर्जाच्या दिनांक पर्यंत फैजपूर नगर परिषदेमार्फत नपा फंडातून व वार्षिक निविदांद्वारे करण्यात आलेल्या सर्व कामांची माहिती मागविण्यात आली आहे.यामध्ये कामनिहाय यादी, निविदा, अंदाजपत्रके (इस्टीमेट), कार्यादेश, संबंधित कंत्राटदारांची नावे, काढण्यात आलेली बिले, अदा केलेल्या रकमेचा तपशील तसेच पूर्ण झालेल्या आणि सुरू असलेल्या कामांची माहिती संबंधित कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती देण्याची मागणी करण्यात आली आहे.


नगर परिषदेमार्फत करण्यात येणाऱ्या विकासकामांमध्ये पारदर्शकता राहावी, सार्वजनिक निधीचा विनियोग कशा प्रकारे करण्यात आला आहे याची माहिती नागरिकांना मिळावी आणि शहरातील विकासकामांचा वस्तुनिष्ठ तपशील समोर यावा, या उद्देशाने हा अर्ज सादर करण्यात आला आहे.
नगर परिषद प्रशासनाने मागितलेली माहिती लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती अर्जाद्वारे करण्यात आली आहे.


निवेदनाद्वारे सौ. सुमय्या बी. शेख कुर्बान नगरसेविका, प्रभाग क्र १, नगर परिषद, यांनी मागणी केलेली आहे तसेच विद्यमान नगरसेविका सौ सुमय्या बी शे कुर्बान यांनी प्रत्यक्ष माहिती देताना सांगितले की १ जानेवारी ते ऑक्टोंबर या दहा महिन्याच्या कालावधीमध्ये नपाच्या वार्षिक फंडातून निवेदा काढून जवळपास दोन कोटी 50 लाखाचे कामे करण्यात आलेली आहेत याची माहिती मागविण्यात आली आहे तसेच शहरातील कचरा उचल करणारे रोजंदारी कर्मचारी यांची 25 जणांची आवश्यकता असताना त्या ठिकाणी 37 कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली आहे तसेच ठीक ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकण्यात आलेली आहेत त्याचा पूर्ण तपशील मिळावा.

पावसाळ्यात जुलै महिन्यात इस्लामपुरा झोपडपट्टी तहा नगर तसेच शहरात इतर ठिकाणी मुरूम टाकण्यात आलेले आहेत ते जवळपास 35 लाख रुपये दाखवण्यात आले आहेत ते संशय वाटत असून वार्षिक फंडातून करण्यात आले असून एवढ्या रकमाचे नियोजन नाही कारण शहर विकासासाठी जिथे खर्च करायचे आहे तिथे खर्च केलेले नाही वार्षिक फंडातून कर्मचाऱ्यांचे पगार हे कुठून देणार असाही शेवटी त्यांनी माहिती देताना आरोप केला आहे


बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!