ऐनपूर महाविद्यालयात जागतिक रक्तदाता दिवस साजरा
ऐनपूर, ता. रावेर.मंडे टु मंडे न्युज | येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागामार्फत जागतिक रक्तदाता दिवस मा. प्राचार्य डॉ जे बी अंजने यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉ एस ए पाटील व डॉ पी आर महाजन हे होते. डॉ एस ए पाटील रक्त दान चे महत्व समजावून सांगितले तर डॉ पी आर महाजन यांनी रक्त दान केल्याने होणारे शारीरिक फायदे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात मा. प्राचार्य डॉ जे बी अंजने यांनी हा दिवस का साजरा करण्यात येतो व त्याचे महत्व सांगितले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रा हेमंत बाविस्कर यांनी केले तर आभार प्रदर्शन उप प्राचार्य डॉ एस एन वैष्णव यांनी केले. या कार्यक्रमाला डॉ जे पी नेहेते, डॉ. एस बी पाटील, डॉ पी आर गवळी, डॉ रामटेक, प्रा एस पी उमारीवड, डॉ एन यू बारी, प्रा प्रदीप तायडे, प्रा अक्षय महाजन, प्रा. एस बी महाजन हे उपस्थित होते. तर श्री हर्षल पाटील, श्री श्रेयस पाटील व अनुराग पाटील यांनी मेहनत घेतली

