भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

अमळनेरजळगाव

माजी मंत्र्यांची ४ कोटी ८५ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल

जळगाव जिल्ह्यातील प्रकार

जळगाव, मंडे टु मंडे न्युज |विश्वास संपादन करून आर्थिक व्यवहारात गैरप्रकार केल्या प्रकरणी माजी राज्य मंत्र्यांच्या फिर्यादीवरून एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्याचे माजी राज्यमंत्री गुलाबराव बाबुराव देवकर यांच्या फिर्यादीवरून तब्बल ४ कोटी ८५ लाख ३ हजार ५८२ रुपयांच्या अपहार व फसवणुकीचा गुन्हा जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुलाबराव बाबुराव देवकर (वय ७०, रा. वास्तुनगर, सावखेडा शिवार, जळगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी लोकेश उर्फ चेतन गणेश कोल्हे (रा. नशिराबाद, ता. जि. जळगाव) याने दि. १ ऑगस्ट २०२० ते ३१ मे २०२३ या कालावधीत विश्वास संपादन करून श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ, जळगाव अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमधील आर्थिक व्यवहारांत संस्थेच्या निधीचा अपहार करून एकूण ४ कोटी ८५ लाख ३ हजार ५८२ रुपयांचा गैरव्यवहार करून फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. फसवणूक, विश्वासघात, बनावट कागदपत्रे तयार करणे व त्यांचा वापर करणे या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या मदतीने एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!