भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावप्रशासन

जळगाव जिल्ह्यातील पोलिस निरीक्षकांसह पोलिस उप निरीक्षकांच्या बदल्या

जळगाव, मंडे टु मंडे न्युज| जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी सोमवारी रात्री उशिरा जिल्ह्यातील १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तत्काळ पदावर रूजू होण्याचे आदेशात नमूद आहे. कार्यकाळ पूर्ण झालेल्या तसेच जिल्ह्यात नव्याने हजर झालेल्या व रिक्त पदावर निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत तसेच सहाय्यक निरीक्षकांसह उपनिरीक्षकांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.

जळगाव शहर वाहतूक शाखेचे पवन देसले यांची चोपडा शहर निरीक्षकपदी बदली.
भुसावळ तालुक्याचे महेश गायकवाड यांना शहर ठाण्याच्या निरीक्षकपदी नियुक्ती मिळाली आहे.

चोपडा ग्रामीणचे महेश टाक आता भडगाव प्रभारी असतील.

जळगाव आर्थिक गुन्हे शाखेचे संदीप पाटील यांच्याकडे रावेर ठाण्याची धूरा असेल.

धरणगावचे सुनील पवार हे एरंडोल प्रभारी असतील.

एरंडोल प्रभारी निलेश गायकवाड आता भुसावळ तालुक्याचे प्रभारी असतील.

सहाय्यक निरीक्षकांच्याही बदल्या
चाळीसगाव ग्रामीणचे एपीआय नितीन पाटील मेहुणबारे प्रभारी
रामानंदचे संदीप पाटील फैजपूर प्रभारी
शनीपेठचे साजीद मन्सुरी मारवड प्रभारी
अडावदचे प्रमोद वाघ एमआयडासा ठाण्यात
रामानंदचे भूषण कोते पाळधी दूरक्षेत्र ठाण्यात
पाळधीचे प्रशांत कंडारे अडावद प्रभारी
रामानंदचे निलेश राजपूत सायबर पोलीस ठाण्यात

प्रशासकीय बदली
मारवड प्रभारी जिभाऊ पाटील यांची धुळे जिल्ह्यात प्रशासकीय बदली करण्यात आली आहे.

कालावधी पूर्ण झालेल्या या अधिकाऱ्यांच्या बदल्या
रावेरचे निरीक्षक विशाल जयस्वाल यांची शनीपेठ प्रभारी तर चोपडा शहरचे मधुकर साळवे यांची रामानंद ठाण्यात प्रभारीपदी बदली करण्यात आली आहे. चोपडा शहरचे एपीआय एकनाथ भिसे यांना एक वर्ष मुदतवाढ मिळाली आहे

जिल्ह्यात नव्याने आलेल्या निरीक्षक उमाकांत गायकवाड यांना धरणगाव प्रभारीपदी नियुक्त करण्यात आले.
पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना पारोळा प्रभारीपदी नियुक्त करण्यात आले.
पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांना चोपडा ग्रामीणच्या प्रभारीपदी नियुक्त करण्यात आले.
पोलीस निरीक्षक मोरेश्वर लक्ष्मण पेंदाम यांना जळगाव शहर वाहतूक शाखेची धूरा देण्यात आली.
पोलीस निरीक्षक आशिष लव्हंगळे यांना बोदवड ठाण्याच्या प्रभारी नियुक्ती मिळाली. एपीआय निलेश सरदार यांना भुसावळ तालुका, एपीआय राहुल तायडे यांना बाजारपेठ, एपीआय अशोक पिंपळे यांना पारोळा व एपीआय नयन पाटील यांना जळगाव तालुका ठाण्यात नियुक्ती मिळाली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!