भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

अत्याचाराचे काढलेले अश्लील व्हिडिओ व्हायलर करण्याची धमकी देत तरुणीवर पुन्हा वारंवार अत्याचार

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | १८ वर्षीय तरुणीवर जबरजस्ती अत्याचार करून अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ही घटना जळगाव शहरातील महाबळ परिसरात घडल्याचं समोर आले. चौघां आरोपी विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अखेर या अत्याचाराला कंटाळून पीडित तरुणीने रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर बुधवार, ३० जुलै रोजी रात्री ७.३० वाजता चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, यांतील मुख्य आरोपी गणेश साहेबराव पाटील याने १४ सप्टेंबर रोजी पीडित तरुणीला बोलण्यात गुंतवून तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केला. या घटनेचे त्याने फोटो व व्हिडिओ तयार केले. त्यानंतर त्याच माध्यमाचा वापर करून आरोपीने तरुणीला धमकावत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे, गणेश पाटील याने तरुणीला पळवून नेत तिचे आक्षेपार्ह फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड करून तिची बदनामी केली.

या संपूर्ण प्रकारात विजय, विकास व मनोज (पूर्ण नावे माहिती नाही) या तिघांनी आरोपी गणेश साहेबराव पाटील याला मदत केली असल्याचे पीडितेच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय शेलार करत असून आरोपींच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरू आहे. आरोपींना अटक केल्यानंतर तपासात आणखी धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!