मंडे टू मंडे वृत्ताची दखल, खिर्डी खु.येथे नवीन गावठाण मध्ये दुर्गंधी पसरल्याने निर्जंतुकीकरण पावडर ची फवारणी
खिर्डी ता.रावेर (प्रतिनिधी)। येथील नवीन गावठाण मध्ये दुर्गधी पसरल्याने नागरिक हैराण झाले होते , या बाबत सविस्तर वृत्त असे की,मंडे टू मंडे वृत्तपत्रा मध्ये आलेल्या बातमी ची दखल घेत नवीन गावठाण मध्ये २५ ते ३०वर्षा पासून जीर्ण व बंद पडलेल्या सार्वजनिक शौचालय जवळील परिसरात तीन ते चार दिवसापासून अत्यंत दुर्गंधी पसरली असून तेथील रहिवाश्यांनी शोधाशोध केला असता खिडक्या मधून आत डोकावून पाहिले असता त्या ठिकाणी कुजलेल्या अवस्थेत मेलेला कुत्रा आढळून आल्याने रहिवाश्यांनी ग्राम पंचायत प्रशासनास तोंडी कळवून सुध्दा या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असून या बाबत रहिवाशी लोकांनी मंडे टू मंडे च्या प्रतिनिधी कडे आपली व्यथा मांडली असता सदरील समस्याची बातमी प्रसारीत केल्याने त्वरित दखल घेऊन त्या ठिकाणी सफाई कर्मचारी प्रमोद हंसकर यांनी माती टाकून निर्जंतुकीकरण पावडर ची फवारणी करून योग्य ती विल्हेवाट लावली.रहिवासी लोकांनी मंडे टू मंडे न्यूज टीम चे आभार मानले.

