मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्याचा जिल्हा दौरा
जळगाव, मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी : राज्यात शिंदे भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे हे २० सप्टेंबर मंगळवार रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे विश्रामगृह इमारतीच्या लोकार्पण सोहळा आणि मुक्ताईनगर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
- दुष्काळाच्या सावटात वाढदिवसाचा जल्लोष नको; आ.चंद्रकांत पाटील यांची संवेदनशील भूमिका, शुभेच्छांसाठी प्रत्यक्ष येऊ नये; कार्यकर्त्यांनी समाजोपयोगी उपक्रम राबवावेत !
- शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी: आता स्वतःच्या मोबाईलवरून करा ई-पीक पाहणी!
- राज्यात २७ जिल्ह्यांना यलो, ३ ठिकाणी ऑरेंज अलर्ट, उत्तर महाराष्ट्रातही पाऊस, जळगाव-नाशिकला यलो, धुळे-नंदुरबार ऑरेंज अलर्ट
दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे–
मंगळवार 20 सप्टेंबर रोजी दुपारी 3.00 वा. जळगाव विमानतळ येथे आगमन व मोटारीने पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण. दुपारी 3.45 वा. पाळधी येथे आगमन. दुपारी 4.00 वा. पाळधी येथील शासकीय विश्रामगृह नविन इमारतीचा लोकार्पण सोहळा. सायं. 4.30 वा.पाळधी येथून मोटारीने मुक्ताईनगरकडे प्रयाण. सायं. 5.30 वा. मुक्ताईनगर येथे आगमन व जाहिर सभेस उपस्थिती. रात्री सोईनुसार मुक्ताईनगर येथून मोटारीने जळगाव विमानतळाकडे प्रयाण. रात्री सोईनुसार जळगाव विमानतळ येथे आगमन व तेथुन शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.





