जळगाव जिल्ह्यात आज १७८ रुग्ण पॉझिटिव्ह; २५६ कोरोना मुक्त
जळगाव प्रतिनिधी । आज प्राप्त झालेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात १७८ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तर जिल्ह्यातून आज २५६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.
जिल्ह्यातील आजची कोरोना आकडेवारी–
जळगाव शहर २६, जळगाव ग्रामीणी ४, भुसावळ ११, रावेर १४, अमळनेर ८, चोपडा ५, भडगाव १, पाचोरा १३, धरणगाव ५, यावल ५, एरंडोल ५, जामनेर ४०, पारोळा ३, चाळीसगाव ७, मुक्ताईनगर ३०, बोदवड ०, इतर जिल्हे १ असे एकुण १७८ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात एकुण रूग्ण संख्या ५२६९३ कोरोना पॉझिटिव्ह झाली आहे. त्यात ५००७२ रूग्ण कोरोनामुक्त झाली असून १३६७ रूग्ण उपचार घेत आहे. आज २ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर एकुण मृतांचा आकडा १२५४ वर पोहचला आहे.

