भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राजकीयरावेर

रावेर भाजपाची जबाबदारी सुरेश धनके यांच्यावर

रावेर (प्रतिनिधी)। माजी कृषी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे यांनी रावेर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्याशी संपर्क साधून राहण्याची जबाबदारी भाजपचे जेष्ठ पदाधिकारी सुरेश धनके यांच्यावर टाकली आहे,

मी तालुक्यातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधींशी संपर्क साधला असता आम्ही पक्षासोबत असल्याचे त्यांनी सुरेश धनके यांना सांगितल्याचे श्री धनके त्यांनी ” मंडे टू मंडे ” शी बोलताना सांगितले,

तालुक्यात भाजपाची जबाबदारी पक्षाने भाजपाचे जेष्ठ पदाधिकारी सुरेश धनके यांच्यावर सोपवली असून. श्री धनके प्रत्येक पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांच्या संर्पकात आहे.रात्री उशिरा पर्यंत पदाधिकारी भाजपा कार्यालयात ठाण मांडून होते. रात्री उशिरापर्यंत रावेर भाजपा कार्यालयात महत्वाच्या पदाधिका-यांचे मंथन सुरु होते. यामध्ये भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष अमोल पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, सरचिटणीस महेश चौधरी, उपसभापती जुम्मा तडवी, पी.के महाजन, संदीप सावळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!