भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

खिर्डी खु येथे नवीन गावठाण मध्ये दुर्गंधी पसरल्याने रहिवाशी त्रस्त

खिर्डी ता.रावेर (प्रतीनिधी)। खिर्डी खु येथील बलवाडी रोड वरील नवीन गावठाण परिसरातील पाण्याच्या टाकी जवळ असलेल्या शौचालय अत्यंत जीर्ण झाल्याने २५ ते ३० वर्षा पासून बंद पडलेल्या अवस्थेत असून. ४ ते ५ दिवसा पासून या परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

तेथील नागरिकांनी दुर्गंधी कोठून येत आहे याचा शोध घेत तेथे असलेल्या खिडक्यां मधून आत डोकावून पाहिले असता त्या ठिकाणी पिसाळलेला कुत्रा मेलेला आढळला असता रहिवाश्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला तेथील रहिवाशी यांनी ग्रामपंचायत प्रशासक यांना मोबाईल वर संपर्क साधून माहिती देण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा मोबाईल नॉट रि चेबल येत असल्याने संपर्क न झाल्याने रहिवाशांनी नाराजी चा सुर व्यक्त केला. ग्रामपंचायत प्रशासनाने त्वरित दखल घेऊन मेलेल्या कुत्र्याची योग्य ती विल्हेवाट लावावी अशी मागणी तेथील रहिवाशी लोकांनी केलेली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!