जळगांव जिल्ह्यात २२५ रुग्ण कोरोना मुक्त; ९८ पॉझिटिव्ह !
जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवाला मध्ये आज जिल्ह्यातून फक्त ९८ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, तर २२५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.
जिल्ह्यातील आजची कोरोनाची आकडेवारी–
जळगाव शहर ३८, जळगाव ग्रामीण ०, भुसावळ १३, अमळनेर ३, चोपडा ४, पाचोरा ३, भडगाव १, धरणगाव १, यावल ३, एरंडोल ०, जामनेर ९, चाळीसगाव ११, मुक्ताईनगर ४, बोदवड ३, इतर जिल्ह्यातील १ असे एकुण ९८ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात एकुण कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण संख्या ५२३८८ झाली असून त्यात ४९५७९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर आज २ रूग्णांचा मृत्यू झाला असून एकुण १२५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. व आता १५५९ रूग्ण उपचार घेत आहे.

