Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

१६० कोटींचा शालार्थ आयडी घोटाळा : १२ संस्थाचालक रडारवर; अटकेच्या भीतीने जळगाव मधील काही शिक्षण संस्थाचालक अंडरग्राऊंड, १,२०० संशयितांची ओळख पटली

जळगाव | मंडे टु मंडे न्यूज | सरकारी शालार्थ पोर्टलवर शिक्षकांच्या नावाने बनावट आयडी तयार करून वेतनाचा अपहार केल्याच्या कथित १६० कोटी रुपयांच्या शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी (ता. जामनेर) येथील शिक्षण संस्थेचे प्रमुख व भाजप नेते संजय गरुड (वय ६७) यांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली. नाशिक न्यायालयाने त्यांना १ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


तपास यंत्रणेला प्राथमिक तपासात गरुड यांच्या संस्थेच्या नावावर एका दिवसात तब्बल १७७ बनावट शालार्थ आयडी तयार झाल्याचा संशय आहे. या कारवाईमुळे राज्याच्या शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) संदीप मिटके यांनी दिलेल्या माहितीनुसार, गरुड यांच्या व्यवस्थापनाखालील शैक्षणिक संस्थेशी संबंधित असल्याचे भासवून १५० हून अधिक शिक्षकांची बनावट प्रोफाइल तयार करण्यात आली होती.


१२ संस्थाचालक तपासाच्या रडारवर
या घोटाळ्याच्या तपासात जळगाव जिल्ह्यातील १० तर धुळे जिल्ह्यातील २ अशा एकूण १२ शिक्षण संस्थाचालकांची नावे तपासाच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच काही शिक्षणाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांची भूमिकाही तपासली जात आहे.


संजय गरुड यांच्या अटकेनंतर तपासाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, अटकेच्या भीतीने काही संस्थाचालकांनी जिल्हा सोडल्याची माहिती समोर येत आहे. काहींनी अटकपूर्व जामिनासाठी हालचाली सुरू केल्याचे सांगितले जात असून, पाच ते सहा संस्थाचालकांचे मोबाईल बंद असल्याची माहिती तपास यंत्रणेकडे आहे. या प्रकरणातील अटक आरोपी प्रशांत वाडीले (धुळे) हा अनेक संस्थाचालकांशी संपर्कात असल्याचा संशय असून, त्याच्या चौकशीतून अनेक महत्त्वाचे धागेदोरे समोर आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.


१,२०० संशयितांची ओळख; पाच जण अटकेत
एसीपी संदीप मिटके यांनी सांगितले की, आतापर्यंत २०० हून अधिक शाळांचा या घोटाळ्याशी संबंध असल्याचे समोर आले आहे. तसेच १,२०० संशयितांची ओळख पटली असून, आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
ग्रामीण विकास विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथक (एसआयटी) या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.


तपासाची चाहूल लागताच गरुड जिल्ह्याबाहेर
संजय गरुड यांच्या संस्थेच्या जामनेर, पाचोरा, भडगाव आणि चोपडा तालुक्यांत १५ ते २० प्राथमिक व माध्यमिक शाळा, दोन कनिष्ठ महाविद्यालये, एक वरिष्ठ महाविद्यालय तसेच काही वसतिगृहे कार्यरत आहेत. एसआयटीने यापूर्वी अटक केलेले तत्कालीन जिल्हा शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनंतर तपासाचा केंद्रबिंदू शेंदुर्णी येथील संस्थेकडे वळल्याने तपासाची चाहूल लागताच संजय गरुड काही दिवसांपूर्वी जिल्ह्याबाहेर निघून गेले होते अशी माहितीही समोर आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!