भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

१८ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार, जळगाव मध्ये खळबळ

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव मधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे .जळगाव शहरातील तांबापुरा मछली मार्केट परिसरात एका १८ वर्षीय
तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली असून
तरुणीला तिच्या भावाला मारून टाकण्याची भीती दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा हा प्रकार घडला असून या प्रकरणी शाकीब अस्लम पटेल याचे विरुद्ध एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार आरोपी शाकीब अस्लम पटेल (वय २०, रा. तांबापुरा, मछली बाजार, जळगाव) याने १ नोव्हेंबर २०२५ ते २० मे २०२६ या कालावधीत तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी पीडित तरुणीला दिली. तसेच तरुणीला या भीतीपोटी तांबापुरा मछली मार्केट येथील राहत्या घरी वेळोवेळी बोलावून, तिच्या संमतीशिवाय बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. त्या छळातून पीडित तरुणीला गर्भधारणा झाली. त्यानंतर संशयित आरोपी शाकीब पटेल याने तिला गर्भपाताच्या गोळ्या आणून दिल्या आणि त्या खाण्यास भाग पाडले, अशी तक्रार पीडित तरुणीने जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली. प्रकरणी संशयित आरोपी शाकीब अस्लम पटेल (वय २०, रा. तांबापुरा, मछली बाजार, जळगाव) याचे विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४ (२) (m), ८९ आणि ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर तक्रारी संदर्भात माहिती मिळताच उपविभागीनय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे (S.D.P.O.) यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड आणि ग्रेड पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे. मात्र आरोपीला अद्याप अटक झालेली नसून पोलिस त्याचा शोध घेत आहेत, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे हया करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!