भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

जळगाव मध्ये हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा ; तीन महिलांसह पुरुष ताब्यात

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव शहरात हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा (Sex Racket) पर्दाफाश करत पोलिसांनी तीन महिलांसह एका पुरुषाला ताब्यात घेतले.जळगावमधील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये (Housing Society) हा देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ही धडक कारवाई केली.

जळगाव शहरात हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. निमखेडी रोडवर असलेल्या ‘ब्रह्मांड नायक’ अपार्टमेंटमध्ये छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांनी धडक छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी तीन महिला आणि एका पुरुषाला ताब्यात घेतले आहे.

हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचे काळे रॅकेट उघडकीस
जळगावात पुन्हा एकदा रहिवासी भागात सुरू असलेल्या हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचे काळे रॅकेट उघडकीस आले आहे. जळगाव शहरातील निमखेडी रोडवर असलेल्या ‘ब्रह्मांड नायक’ अपार्टमेंटमध्ये छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांनी धडक छापा टाकला. जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या’ (AHTU) पथकाने ही मोठी कारवाई केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन महिला आणि एका पुरुषाला ताब्यात घेतले आहे. या घटनेसंदर्भात पोलिस अधिकचा तपास करत आहेत.

या कारवाईमुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, या रॅकेटचे मुख्य सूत्रधार कोण आहेत आणि यामागे एखादी आंतरजिल्हा टोळी सक्रिय आहे का, याचा शोध पोलिस घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!