भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राष्ट्रीय

अखेर २६ दिवसांचे उपोषण मागे; सोनम वांगचूक यांनी घेतला निर्णय, उपोषण सोडल्यानंतर काय म्हणाले? मोदींनी दिला मोठा शब्द

दिल्ली. मंडे टु मंडे न्यूज | मागील २६ दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण अखेर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी मागे घेतले. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांनी गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी जे. पी. नड्डा यांच्या हस्ते ज्यूस घेऊन वांगचूक यांनी उपोषण सोडले.

उपोषण मागे घेतल्यानंतर सोनम वांगचूक यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत आपल्या निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री, लेह-लडाखमधील प्रमुख संस्थांचे प्रतिनिधी तसेच विविध राजकीय पक्षांच्या ६५ खासदारांनी उपोषण समाप्त करण्याचे आवाहन केले होते. अनेक अटी, सविस्तर चर्चा आणि देशात संभाव्य हिंसाचार टाळण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले.

वांगचूक यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “२६ दिवसांचे उपोषण आता संपवले आहे. या निर्णयामागील सर्व अटी आणि चर्चा मी लवकरच एका व्हिडिओद्वारे देशासमोर मांडणार आहे. सर्व नागरिकांनी सतर्क राहावे आणि कोणत्याही परिस्थितीत हिंसाचाराचा मार्ग स्वीकारू नये,” असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं आहे. “गुन्हेगारांना पकडलं असून ते जेलमध्ये आहेत. गेल्या अडीच महिन्यात कठोर कारवाई केली आहे. पेपरफुटी विरोधात कायदा बनवणार” असं आश्वासन मोदी यांनी दिलं आहे. नीट पेपर लीक प्रकरणावरुन सध्या देशात मोठा गदारोळ सुरु आहे.

दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड घडली आहे. या प्रकरणावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत विरोधकांनी सरकारला घेरले असून विविध ठिकाणी आंदोलन सुरू होते

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!