भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

धार्मिकरावेर

रावेर तालुक्यातील दसनूर येथे बारा गाड्या, व यात्रा उत्सव जल्लोषात


सिंगनूर ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज | रावेर तालुक्यातील दसनूर येथील उमेश्वर महादेव यात्रा उत्सव दि 11 सप्टेंबर रोजी पार पडली . यात्रेमध्ये खेळणी , पाळणे, संसार उपयोगी वस्तूंची दुकाने थाटली होती.

यात्रा व एकनाथ महाराज बारा गाड्या पाहण्यासाठी गावातील व परिसरातील ग्रामस्थांची गर्दी झाली होती. तसेच देवी-देवतांना नैवेद्य दाखवून संध्याकाळी 6 वाजता भगत बाळू कोळी आंदलवाडी, यांनी बारा गाड्या ओढल्या , त्यांना बगले म्हणून प्रभाकर कोळी , बगले गणेश कोळी, यांनी साथ दिली, पोलिस पाटील दिपक चौधरी, त्रंबक चौधरी, महेश चौधरी, राहूल महाजन , तरूण भारत वार्ताहर हेमंत चांदवे व गावातील ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.

तसेच पोलीस बंदोबस्त निंभोरा पोलीस स्टेशन A.P.I मीरा देशमुख,PSI अभय ढाकणे, अमोल वाघ गोपनीय अधिकारी, योगेश चौधरी हवालदार, परेश सोनवणे पो. कॉन्स्टेबल , संतोष काटोले होमगार्ड ऑफिसर, राजेश पाटील होमगार्ड, विजय चौधरी होमगार्ड, प्रवीण तायडे होमगार्ड , सतीश सपकाळे होमगार्ड , ज्योती सरोदे होमगार्ड , ज्योती कोळी होमगार्ड , यांनी चौख बंदोबस्त ठेवला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!