भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

यावल तालुक्यातील ३२ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी घेतली

फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | यावल तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. यावल तालुक्यातील एका ३२ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. तालुक्यातील एका ३२ वर्षीय महिलेशी जीवनसाथी डॉट कॉम वर बुलढाणा येथील तरुणाने ओळख निर्माण केली नंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अनेक ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तिला न कळता त्याची व्हिडिओ शूटिंग केले आणि नंतर ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून खंडणी मागितली. महिलेने बदनामीच्या धाकापोटी आपले मंगळसूत्र गहाण ठेवून सुमारे ७४ हजारांची खंडणी आरोपी ला द्यावी लागली.

यावल तालुक्यातील एका गावातील ३२ वर्षीय महिलेने फैजपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तिची ओळख जीवनसाथी डॉट कॉमवर तुषार सिद्धार्थ तायडे (रा. गौतम नगर, सुंदर खेड, जि. बुलढाणा) याच्याशी झाली. १० जून २०२५ पासून ते १६ मे २०२६ दरम्यान या तरुणाने महिलेस लग्नाचे आमिष दाखवले व नंतर तिला फैजपूर, भुसावळ, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, फर्दापुर आणि बुलढाणा येथे लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केला.

या वेळी महिलेच्या नकळत व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. नंतर सदर व्हिडिओ रेकॉर्डिंग तुझ्या पतीला दाखवेल, सोशल मीडियावर व्हायरल करेल, असे धमकावून तिच्याकडून तीन लाखाची खंडणी मागितली व शेवटी खंडणी पोटी महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र गहाण ठेवून ७४ हजार रुपये घेतले. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलिसात तुषार सिद्धार्थ तायडे (रा. गौतम नगर, सुंदर खेड, जि. बुलढाणा) याचे विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!