भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

शिर्डीत श्रद्धेच्या नावाखाली भक्तांच्या जीवाशी खेळ! विकला जातोय बुरशी युक्त प्रसाद

शिर्डी,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | शिर्डी हे देशातील सर्वांत मोठ्या धार्मिक स्थळांपैकी एक आहे. दररोज राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून हजारो भाविक, तर वर्षभरात कोट्यवधी साईभक्त येथे दर्शनासाठी येतात. साईबाबांच्या दर्शनानंतर प्रसाद खरेदी करणे हा भाविकांच्या श्रद्धेचा भाग असतो. याच श्रद्धेचा फायदा घेत मंदिर परिसरातील अनेक खासगी दुकानांमधून पेढा प्रसादाची मोठ्या प्रमाणावर विक्री केली जाते. मात्र, या प्रसादाच्या गुणवत्तेबाबत आणि सुरक्षिततेबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत

शिर्डीमध्ये प्रसादाच्या नावाखाली भाविकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे उघडकीस आले आहे। साई मंदिर परिसरातील काही खाजगी दुकानांमध्ये बुरशी लागलेले आणि निकृष्ट दर्जाचे पेढे (विषारी सदृश) विकले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

प्रसादाचा उलगडा
मंदिर परिसरातील काही दुकानांतून विकल्या जाणाऱ्या पेढ्यांच्या बॉक्सवर एक्स्पायरी डेट (मुदत संपल्याची तारीख) किंवा उत्पादक कंपनीचा पत्ता नसतो. काही पेढे इतके कडक व जुने होते की ते अक्षरशः दगडासारखे वाटत होते आणि त्यावर बुरशीही आढळली आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत ‘अन्न व औषध प्रशासनाने’ (FDA) शिर्डीतील अनेक पेढा विक्रीच्या दुकानांवर धडक धाडी टाकल्या. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दुकानांमधून पेढ्यांचे नमुने गोळा केले असून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर दोषी आढळणाऱ्या दुकानदारांवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात येईल.

साईबाबांच्या पवित्र नगरीत भाविकांच्या श्रद्धेची उघडपणे फसवणूक होत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मंदिर परिसरात विकल्या जाणाऱ्या पेढा प्रसादाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे उघड झाले असून, अनेक पेढ्यांवर बुरशी आढळल्याने खळबळ उडाली आहे.


हजारो भाविक दररोज आणि कोट्यवधी भाविक वर्षभर शिर्डीत दर्शनासाठी येत असताना, त्यांच्या आरोग्याशी अक्षरशः खेळ सुरू असल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे हे पेढे संस्थानचे नसून खासगी विक्रेत्यांकडून विकले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.अन्न व औषध प्रशासनाचे पथक तातडीने शिर्डीत दाखल झाले. ९ जूनला मंगळवारी मंदिर परिसरातील अनेक दुकानांवर छापेमारी करण्यात आली. संशयित पेढ्यांचे नमुने तपासणीसाठी जप्त करण्यात आले असून, पनीरमधील संभाव्य भेसळीचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे.


भाविकांना विकल्या जाणाऱ्या प्रसादावर ना उत्पादकाचे नाव, ना उत्पादन दिनांक, ना एक्सपायरी डेट! अनेक दुकानांत दगडासारखे कडक आणि बुरशीयुक्त पेढे खुलेआम विकले जात असल्याचे दिसून आले. रस्त्यांवरही अशाच प्रकारे प्रसाद विक्री सुरू असल्याचे समोर आले आहे. इतका गंभीर प्रकार अनेक वर्षे सुरू असतानाही शिर्डी नगरपालिका आणि अन्न-औषध प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!