भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

घरगुती गॅस सिलेंडर बुकिंगचा ४५ दिवसांचा नियम रद्द ; आता २५ दिवसांनी करता येणार बुकिंग

आता शहरी-ग्रामीण ग्राहकांसाठी समान नियम

मुंबई.मंडे टु मंडे न्युज | घरगुती एलपीजी सिलेंडरच्या बुकिंगबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी लागू असलेला ४५ दिवसांचा इंटर-रीफिल बुकिंग गॅप आता रद्द करण्यात आला असून, तो २५ दिवसांवर आणण्यात आला आहे. त्यामुळे आता ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी सिलेंडर बुकिंगचा कालावधी समान असणार आहे.

पेट्रोलियम मंत्रालयाने एलपीजी रीफिल बुकिंगच्या नियमात सुधारणा करण्याचे निर्देश सरकारी तेल कंपन्यांना दिले आहेत. सुधारित नियमानुसार, ग्राहकाने एक सिलेंडर बुक केल्यानंतर किमान २५ दिवस पूर्ण झाल्यानंतर पुढील सिलेंडर बुक करता येणार आहे.

ग्रामीण ग्राहकांना मोठा दिलासा
यापूर्वी ग्रामीण भागातील घरगुती एलपीजी ग्राहकांना दोन सिलेंडर बुकिंगमध्ये ४५ दिवसांचे अंतर ठेवण्याचा नियम लागू करण्यात आला होता. पश्चिम आशियातील संघर्ष आणि त्याचा एलपीजी पुरवठा साखळीवर झालेला परिणाम लक्षात घेऊन हा निर्बंध लागू करण्यात आला होता.

मात्र, आता देशातील एलपीजी पुरवठा पूर्ववत झाला असून सिलेंडरचा बॅकलॉगही मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. पुरवठ्याची स्थिती सामान्य झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने ग्रामीण भागातील ४५ दिवसांचा नियम हटवून २५ दिवसांचा समान नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

आता शहरी-ग्रामीण ग्राहकांसाठी समान नियम
या निर्णयामुळे देशभरातील घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी बुकिंगची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांना पूर्वीच्या ४५ दिवसांच्या प्रतीक्षेतून मुक्ती मिळणार असून, आता शहरी आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना २५ दिवसांनंतर पुढील सिलेंडर बुक करता येणार आहे.

एलपीजी पुरवठा सुरळीत झाल्याने आणि मागील बुकिंगचा बॅकलॉग कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विशेषतः ग्रामीण भागातील कोट्यवधी घरगुती गॅस ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!