भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळ

भुसावळातील शिंदे गटात गेलेले “ते” ११ नगरसेवक लवकरच अपात्र होतील? मंत्री संजय सावकारेंचे सूचक विधान

चौधरी बंधूंवरही साधला निशाणा

भुसावळ.मंडे टु मंडे न्युज | भुसावळ नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ११ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला असला, तरी आगामी काळात हे नगरसेवक अपात्र होतील, असा दावा वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे भुसावळच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

माजी आमदार संतोष चौधरी आणि माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्या भूमिकेवरही मंत्री सावकारे यांनी जोरदार टीका केली. नगराध्यक्षा यापूर्वीच अपात्र ठरल्या असून त्यांनीही शिंदे गटात प्रवेश केल्याने आपल्याला दिलासा मिळेल, असे संबंधितांना वाटत असेल; मात्र, ‘पुढे-पुढे पाहा, काय-काय होते ते,’ असे सूचक विधान सावकारे यांनी केले.

सुभाष पोलीस चौकी ते खडका रोड चौफुली या काँक्रिट रस्त्याचे लोकार्पण सोमवारी सायंकाळी मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी भुसावळच्या स्थानिक राजकारणावर भाष्य केले.

ते ‘११ नगरसेवकही लवकरच अपात्र होतील’
मंत्री सावकारे म्हणाले, “हे कोणत्या पक्षात आहेत, हेच कळत नाही. तेथेही (शिंदे गटात) राहतात की नाही, हे लवकरच जनतेला कळेल. पक्ष बदलला म्हणजे आपण वाचू, असा त्यांचा समज आहे. मात्र, पुढे-पुढे काय होते ते पाहा.”

नगराध्यक्षा आधीच अपात्र झाल्या आहेत. त्याचप्रमाणे शिंदे गटात गेलेले हे 11 नगरसेवकही लवकरच अपात्र होतील, असा दावा त्यांनी केला.

‘चौधरी बंधूंच्या विरोधात कधी षडयंत्र रचले नाही’
चौधरी बंधूंच्या भूमिकेवर टीका करताना सावकारे म्हणाले की, “मी आयुष्यात चौधरी बंधूंच्या विरोधात कधीही षडयंत्र रचले नाही. त्यांच्याबाबत पोलिसांना कधी फोनही केला नाही. मात्र, त्यांनी माझ्याविरोधात नेहमीच भूमिका घेतली.”

“मी चांगले काम करतो, त्यामुळे माझे चांगलेच होते. जो दुसऱ्याचे वाईट करतो, त्याचे वाईटच होते,” असेही सावकारे यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाला मंत्री संजय सावकारे, प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, नगरसेवक राजेंद्र आवटे, शोभा इंगळे, नगरसेवक आसीफ खान ऊर्फ मका, संतोष दाढी, हाजी शरीफ ठेकेदार, आशिक खान शेर खान यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!