भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

७३ हजारांची लाच भोवली ; तलाठी व कोतवाल सह पंटर एसीबी च्या जाळ्यात, महसूल विभागात खळबळ

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |जळगाव जिल्ह्यातील महसूल व पोलीस विभागात लाचखोरीच्या अनेक घटना घडत असताना आता भुसावळ येथे वाळू वाहतुकीचे वाहन चालू देण्यासह कारवाई न करण्याच्या मोबदल्यात ७३ हजारांची लाच मागून ती स्वीकारताना भुसावळ तहसील कार्यालयातील तलाठी, कोतवाल व खाजगी पंटराला जळगाव एसीबीने रंगेहाथ अटक केली आहे. ही कारवाई सोमवार, १३ रोजी दुपारी करण्यात आल्याने लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

वाहतुकीचे वाहन चालू ठेवण्यास आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्याच्या मोबदल्यात ७३ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तलाठी, कोतवाल आणि एका खाजगी पंटरला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आज भुसावळ तहसील कार्यालयात रंगेहाथ पकडले. या धडाकेबाज कारवाईमुळे संपूर्ण महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांच्या वाहनावर कारवाई न करण्याच्या ‘मोबदल्यात’ वराड सीमेतील तलाठी नितीन पंडित केले याने तक्रारदार यांच्याकडे ७३ हजार रुपयांची लाच मागितली होती. या लाच मागणीमुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने याबाबत जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार दाखल केली. तक्रारीची गंभीर दखल घेत एसीबीच्या पथकाने लगेच सापळा रचण्याची तयारी केली.

त्यानुसार, सोमवारी (१३ ऑक्टोबर) दुपारी पथकाने पडताळणीसाठी सापळा रचला. भुसावळ तहसील कार्यालयाच्या आवारात तलाठी नितीन पंडित केले याने कोतवाल आणि एका खाजगी पंटरच्या माध्यमातून तक्रारदार यांच्याकडे ७३ हजार रुपयांची मागणी केली. लाच स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असतानाच एसीबीच्या पथकाने तात्काळ कारवाई करत तलाठी नितीन पंडित केले, सोबत असलेला कोतवाल आणि खाजगी पंटर अशा तिन्ही आरोपींना रंगेहाथ पकडले. १) नितीन पंडीतराव केले वय ४०, धंदा तलाठी, सज्जा-व-हाडसिम, ता. भुसावल. ( महसुल विभाग वर्ग ३)
२) जयराज रघुनाथ भालेराव, वय-४९, धंदा-कोतवाल, कडोरा बुद्रूक, ता. भुसावळ,(महसलु विभाग वर्ग-०४)
०३) शिवदास लटकन कोळी, वय-५९, खाजगी पंटर, रा. तित्रे, ता. भुसावळ. (खाजगी इसम)

या कारवाईमुळे भुसावळ तहसील कार्यालयात एकच धावपळ उडाली. महसूल विभागात लाचखोरीचे प्रकार उघडकीस आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!