भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुका दर्शन सोहळ्याचे भव्य आयोजन

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी (जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम) यांचा पादुका दर्शन सोहळा सोमवार, दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता. स्थळ गट नंबर ७४, सावदा फैजपूर बायपास रोड, शासकीय विश्रामगृहासमोर सावदा ता. रावेर, जि. जळगाव. येथे आयोजन करण्यात आहे.

सोहळ्याची रूपरेषा व अध्यात्मिक महत्त्व सकाळी ९ वाजता कार्यक्रमाच्या ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात, टाळ मृदुंगाच्या मंगलमय नाद, कलशधारी महिला, निशानदारी पुरुष, लेझीम पथके आणि विविध सजीव देखाव्यासह रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजींच्या पादुकांची भव्य मिरवणूक काढण्यात येईल. त्यानंतर पादुकांना संत पिठावर विराजमान करून स्वागत आरती आणि विविध मंत्रघोषाने पूजन केले जाईल. पादुका पूजन हे सद्गुरूंप्रती श्रद्धा आणि सन्मान व्यक्त करण्याचे महत्त्वाचे माध्यम असून, या सोहळ्यात वेद मंत्रांच्या उच्चाराने वातावरण भक्तिपूर्ण होईल. उपस्थित भक्तगणांना जगद्गुरूंच्या सिद्ध पादुकांचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्याची अलौकिक संधी मिळणार आहे. जगद्गुरूंच्या कृपा-आशीर्वादाने या ठिकाणी विशेष अध्यात्मिक प्रवचन होणार आहे. तसेच, या कार्यक्रमादरम्यान भाविकांसाठी उपासक दीक्षा आणि गुरूपूजन संपन्न होणार असून, जास्तीत जास्त भाविकांनी उपासक दीक्षा घेण्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे जिल्हा सेवा समितीतर्फे करण्यात येत आहे.

संस्थानचे समाजोपयोगी उपक्रम जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत आले आहे. या सोहळ्यादरम्यान ‘दुर्बल घटक पुनर्वसन’ या योजनेअंतर्गत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त, संस्थानच्या वतीने देहदान, अवयव दान, ग्रामस्वच्छता अभियान, इंग्रजी

माध्यमांची मोफत शाळा, मोफत वेदपाठ शाळा, मोफत दवाखाना, कायदेविषयक साक्षरता शिबिरे, महिला सक्षमीकरण अंतर्गत मोफत शिलाई यंत्र आणि घरघंटी वाटप यांसारखे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. वैद्यकीय क्षेत्रात संस्थानचे कार्य अतुलनीय असून, महाराष्ट्रातील विविध महामार्गावर ५३ रुग्णवाहिका २४ तास अपघातग्रस्तांच्या सेवेत कार्यरत आहेत. तसेच, जानेवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरांतून १,३६,२७० रक्त कुपिंकांचे संकलन करण्यात आले.

जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या कृपेचा आणि आशीर्वादाचा लाभघेण्यासाठी, तसेच सिद्ध पादुकांच्या दर्शनाने स्वतःला पावन करून घेण्यासाठी, जळगाव जिल्ह्यातील सर्व भाविकांनी व नागरिकांनी या सोहळ्याला सहन सहपरिवार, आप्तइष्ट मित्रांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे रामानंदा जळगाव जिल्हा सेवा समिती तर्फे कळकळीचे आवाहन करण्यात येत महंन्मंगल समयी उपस्थित राहणाऱ्या सर्व भाविकांसाठी कार्यक्रमाच्या महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!