भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

धार्मिकमुक्ताईनगरसामाजिक

गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप; भक्तिमय वातावरणात विसर्जन

नायगाव, ता. मुक्ताईनगर. मंडे टु मंडे न्यूज. विठ्ठल कोळी || मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथे गणेशोत्सवानिमित्त विराजमान झालेल्या जय बजरंग गणेश व वाय. जी. एम गणेश मंडळाच्या गणपती बाप्पाला आज भक्तिमय वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला.

सकाळपासूनच गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मंडळांच्या वतीने गणपती बाप्पाची पूजा व आरती करण्यात आली. सायंकाळी गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. बँड च्या जल्लोष्यात आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. मिरवणुकीत तसेच लहान मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

गणेशभक्तांनी ठरवून दिलेल्या विसर्जनस्थळी गणपती मूर्तीचे विधिवत विसर्जन करण्यात आले. यावेळी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी तसेच ग्रामस्थांनी सहकार्य केले. गणेशोत्सवाच्या काळात शांतता, शिस्त व सामाजिक सलोखा राखण्यासाठी ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले. उत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!