चेक बाऊन्स प्रकरणात दोन हजारांची लाच घेताना दोन पोलिसांसह पंटर वर कारवाई
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | चेक बाऊन्स प्रकरणी २ हजार रुपयांची लाच घेताना भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे. ही कारवाई भुसावळ परिसरात करण्यात आल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
यातील तक्रारदार यांचे विरुद्ध खामगांव कोर्ट जि बुलढाणा येथे कलम 138 प्रमाणे चेक बाऊन्स ची केस दाखल आहे. त्यानंतर तक्रारदार यांचे विरुद्ध कोर्टाने अटक वॉरंट काढले होते . सदर वॉरंट मध्ये अटक न करण्यासाठी व अटक वॉरंट कन्सल करण्याची मुदतवाढ देण्याचा मोबदल्यात यातील सहा. फौजदार बाळकृष्ण पाटील, व आत्माराम भालेराव यांनी 5000/- रुपये लाचेची मागणी केली होती त्याबाबत तक्रारदार यांनी दि . 21/08/2025 रोजी ला प्र विभाग जळगांव येथे तक्रार दिली होती . सदर तक्रारी प्रमाणे लाचमागणी पडताळणी केली असता या दोघांनी पंचासमक्ष 2000/- रुपये लाचेची मागणी केल्याची निष्पन्न झालेले आहे .
त्याप्रमाणे आज रोजी सापळा कारवाईचे आयोजन केले असता बाळकृष्ण पाटील यांचे सांगणेवरून आरोपी ठाणसिंग जेठवे खाजगी इसम यांनी लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून यातील तीन ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून आरोपी विरुद्ध भुसावळ तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपी अटक करून तपास करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे.
सदरील कारवाई तपास व सापळा अधिकारी श्री. योगेश ठाकूर, पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि. जळगांव. श्री हेमंत नागरे पोलीस निरीक्षक पोउपनिरी दिनेशसिंग पाटील
पोउपनिरी सुरेश पाटील चालक पोहेकॉ किशोर महाजन, पोना बाळु मराठे, पोकॉ प्रदिप पोळ. पोकॉ/ भुषण पाटील, पो. कॉ/ प्रणेश ठाकूर यांनी केली.

