भुसावळ मध्ये इन्व्हर्टरच्या बॅटरीचा स्फोट, आगीमुळे घरातील साहित्य जळून खाक
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | इन्व्हर्टरच्या बॅटरीचा स्फोट होऊन घरातील साहित्य जळून खाक झाल्याची घटना
भुसावळ शहरातील आनंदनगर भागात गुरुवारी रात्री पावणे नऊ वाजता घडली. मात्र, या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
भुसावळ शहरातील आनंदनगर परिसरातील पुरुषोत्तम गाजरे यांच्या घरातील इन्व्हर्टर बॅटरीचा अचानक स्फोट होऊन आग लागली. त्या आगीमुळे घरातील गादी, चादरीसह इतर साहित्य जळाले. शहरातील गोल्डन अवरचे फार्मासिस्ट जितेश ढाके व एचआर प्रमुख गिरीश कोळी व सहकाऱ्यांनी वेळीच धाव घेत अग्निरोधक सिलिंडरद्वारे आगीवर नियंत्रण मिळवले तर काहीच वेळे भुसावळ पालिकेच्या अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. मिळालेल्या माहितीनुसार यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. वेळीच आग नियंत्रणात आल्याने मोठी हानी टळली.


