भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

नवीन पाईपलाईन जोडणीसाठी नागरिकांकडून २,५०० रुपये वसुलीचा आरोप; चौकशीची मागणी

फैजपूर नगरपालिकेतील प्रकार

फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | फैजपूर शहरातील वार्ड क्रमांक १ (अ) तहा नगर परिसरातील नागरिकांनी नवीन पाणीपुरवठा पाईपलाईन जोडणीसाठी प्रति नळ कनेक्शनधारकाकडून २,५०० रुपये वसूल करण्यात येत असल्याचा आरोप करीत नगरपालिका प्रशासनाकडे चौकशीची मागणी केली आहे.


परिसरात पूर्वी २ इंची पाईपलाईन होती. वाढती लोकसंख्या आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन नगरपालिकेमार्फत ४ इंची नवीन पाईपलाईन टाकण्यात आली. मात्र, नवीन पाईपलाईनवर जुनी नळ कनेक्शने जोडण्यासाठी नागरिकांकडून प्रत्येकी २,५०० रुपये आकारले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.


नागरिकांचे म्हणणे आहे की, ते जुने नळ कनेक्शनधारक असून पाईपलाईन बदलण्याचे काम हे नगरपालिकेचे आहे. त्यामुळे या कामाचा आर्थिक भार सर्वसामान्य नागरिकांवर टाकणे अन्यायकारक आहे. काही नागरिकांनी दबावाखाली संबंधित रक्कम भरल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


मुस्तकीम खान सलीम खान मणियार यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करून प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच जुनी कनेक्शने कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता नवीन पाईपलाईनला जोडण्यात यावीत आणि ज्या नागरिकांकडून रक्कम वसूल करण्यात आली आहे त्यांना ती परत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, मागण्यांवर योग्य कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन व उपोषण करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. :::

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!