भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

लग्नाचे आमिष, तीन वर्षे लैंगिक शोषणाचा आरोप; विवाहास नकार, १.१० लाखांची फसवणूक केल्याची तक्रार

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज | भुसावळ शहरात लग्नाचे आमिष दाखवून तीन वर्षे एका २१ वर्षीय तरुणीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप समोर आला आहे. तसेच विवाहास नकार देत १ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार पीडित तरुणीने बाजारपेठ पोलीस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तरुणासह त्याच्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील २१ वर्षीय तरुणीची आदित्य ब्रजेश वत्स याच्याशी पुण्यात शिक्षण घेत असताना ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाल्यानंतर आरोपीने लग्नाचे आश्वासन दिल्याचा तक्रारीत आरोप आहे.

तक्रारीनुसार, ऑगस्ट २०२३ ते जुलै २०२६ या कालावधीत आरोपीने लग्नाचे आश्वासन देत वेळोवेळी तरुणीशी शारीरिक संबंध ठेवले. तसेच विविध कारणे सांगून तिच्याकडून आर्थिक मदतही घेतली.३० जून रोजी पल्सर दुचाकी खरेदीसाठी पैशांची गरज असल्याचे सांगत आरोपीने ऑनलाइन व्यवहाराद्वारे सुमारे १ लाख १० हजार रुपये घेतल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर १२ जुलै रोजी विवाहाबाबत विचारणा केली असता आरोपीने लग्नास नकार दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर पीडित तरुणीने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आदित्य ब्रजेश वत्स तसेच त्याच्या आई-वडिलांविरुद्ध संबंधित कायदेशीर कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बाजारपेठ पोलीस करत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!