भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

SC-ST आरक्षणात ‘क्रिमी लेयर’चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू

मुंबई, मंडे टु मंडे न्युज | सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) आरक्षणासाठी ‘क्रिमी लेयर’चा सिद्धांत लागू होत नाही. हा नियम फक्त इतर मागासवर्गीय (OBC) आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गांसाठी (SEBC) आहे.

SC-ST आरक्षणात उत्पन्न व क्रिमी लेयर लागू करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिका केंद्र सरकारने फेटाळण्याची मागणी केली आहे.

आरक्षणाचा आधार आर्थिक स्थिती नसून सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण हा आहे.इतिहास: क्रिमी लेयर ही संकल्पना प्रामुख्याने १९९२ च्या मंडल प्रकरणात ओबीसी आरक्षणासाठी आली होती. SC-ST यादीत बदल करण्याचा अधिकार केवळ संसदेला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!