भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

कोजागिरी पौर्णिमेचा अविस्मरणीय अनुभव – आभेगाव कल्याण पूर्व “जाणीव वृद्धाश्रमास” भेट

कल्याण, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राहुल चौधरी फाउंडेशन व लेवा सखी कला मंच, डोंबिवली व परिसर या दोन्ही संस्थांनी एकत्र येऊन कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने जाणीव वृद्धाश्रमात भेट दिली.बीया भेटीचा हेतू होता — वृद्धांना आनंद देणे, कोजागिरीचं सादरीकरण करणे आणि स्वेटर वाटपाद्वारे थंडीत उब देणे. आश्रमात पोहोचल्यावर तिथलं शांत वातावरण, सुंदर निसर्ग, आणि प्रत्येक चेहऱ्यावरचं समाधान — या सगळ्याने मन भारावून गेलं. आमच्या सख्यांनी त्या क्षणांचे सुंदर छायाचित्रण केलं, जणू काही ते सौंदर्य डोळ्यांमध्येच साठवून ठेवलं.

तिथे रोहाऊससारखी छोटी छोटी घरं होती — काहींमध्ये आजी, काहींमध्ये आजोबा, काहींमध्ये एकाकी पण हसरे चेहरे. आम्ही सगळ्यांनी एकेक घरात जाऊन त्यांच्याशी संवाद साधला, त्यांना भेटलो, आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.

त्यानंतर त्यांनी दिलेला कोरा चहा आम्ही प्रेमाने घेतला. आमच्या सख्यांनी दूध आटवून गरमागरम कोजागिरीचं दूध तयार केलं. चंद्राचे प्रतिबिंब त्या दुधात घेतले गेले — जणू चंद्र स्वतः त्यांच्या आनंदात सामील झाला होता.
आम्ही विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जाऊन नैवेद्य दाखवला आणि नंतर सर्वांना ते दूध वाटप केलं.

वृद्धांनी त्यांच्या जीवनकथा सांगितल्या — काहींनी हसत, काहींनी डोळ्यांत पाणी आणून. त्यांच्या गोष्टी ऐकून मन हेलावलं. त्या क्षणी जाणवलं — “आपण आपल्या पालकांना प्रेम देत नाही, तर एक दिवस आपल्यालाही एकाकीपणाचा सामना करावा लागेल.”

आम्ही खरं तर गरबा सादरीकरणासाठी गेलो होतो, पण त्यांच्या कहाण्या ऐकून आमचं मन इतकं भारावलं की आम्ही सगळे काही क्षण नि:शब्द झालो. तिथून निघताना त्या आजीआजोबांचे शब्द अजूनही कानात घुमत आहेत —
“पुन्हा या बरं का, आम्हाला भेटायला…”शेवटी आम्ही सर्वांना स्वेटर वाटप केलं — त्यांचे चेहेरे आनंदाने उजळले. त्या आनंदाच्या क्षणी आमचा थकवा, आमचं दुःख, सगळं विसरून गेलो.


या कार्यक्रमात सहभागी सौ निशाताई शांताराम अत्तरदे (संस्थापिका लेवासखी कलामंच डोंबिवली व परिसर)(समाजसेविका). राहूलदादा चौधरी(राहुल फाउंडेशन संस्थापक).सौ ज्योती चौधरी.सौ श्रध्दा पाटील. सौ सुहासिनी महाजन.सौ सुरेखा पाटील. सौ कामिनी महाजन. सौ शारदा वाणी. सौ कल्पना चौधरी. रात्री नऊ वाजता तिथून परतीचा प्रवासाला लागलो.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!