युवा समिती लेवा पाटीदार समाज भोरगाव लेवा पंचायत अंबरनाथ तर्फे आरोग्य शिबिर संपन्न
अंबरनाथ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | अमरनाथ येथे मोफत आरोग्य शिबिर पार पडले,या आरोग्य शिबिरात परिसरातील १७६ लोकांनी भाग घेतला. आरोग्य शिबिर चे उद्घाटन डॉ. वृषाली भारंबे यांचे क्लिनिक अंबरनाथ येथे अंबरनाथ शहर चे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी की.
या वेळी सुभाष साळुंके, माजी नगराध्यक्ष सुनील दादा चौधरी, निखिल चौधरी, कुणाल भोईर नगरसेवक, अंबरनाथ शहर सुवर्णा साळुंखे तसेच डॉ.कुणाल चौधरी, डॉ. रितेश भारंबे तसेच भोरगाव लेवा पाटीदार पंचायत चे अध्यक्ष बाळू नेहेते, भाग्यश्री ताई पाचपांडे, निशा ताई अत्तरदे आणि नितीन जावळे, प्रतिभा वराडे, विजय दादा वराडे युवा समिती चे मुंबई विभाग समिती प्रमुख श्री मयुरेश नरेंद्र कोल्हे, प्रतिक वराडे, श्री.संजय आदक, नगरसेविका अनिता अदक,तुळशीराम चौधरी,सरिताताई चौधरी, विजय वराडे साहेब तसेच डॉ वृषाली भारंबे, गेंदा पाटील सर, अंबरनाथ अध्यक्ष प्रशांत पाटील,सचिव स्मिता चौधरी, वैशाली पाटील,किरण नेमाडे, भारत महाजन, नीलेश झांबरे, चेतन चौधरी गणेश सरोदे, रुपाली कोल्हे, वर्षा वराडे, हर्षाली कोल्हे, गिरीश चौधरी, अनिल झोपे, मधुरा भोळे,आणि सर्व कार्यकर्ते हजर होते, १७६ लोकांनी अंबरनाथ च्या वेगवेगळ्या भागातून येउन आरोग्यशिबीर चा लाभ घेतला, या मध्ये विशेष रक्त तपासणी आणि जनरल तपासणी केल्या गेल्या आणि आरोग्य बाबत माहिती डॉ. वृषाली भारंबे, डॉ. जयेश वराडे, डाॅ. मीनाक्षी नारखेडे यांनी दिले.
