भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळशैक्षणिकसामाजिक

अंतर्नादची दहा वर्षांची सामाजिक बांधिलकी; ‘एक दुर्वा समर्पण’तर्फे ११३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

भुसावळ. मंडे टु मंडे न्युज || गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा पुढे नेत भुसावळ येथील अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे ‘एक दुर्वा समर्पण’ उपक्रमांतर्गत सांगवी येथील जिल्हा परिषद मुलांची व मुलींची शाळेतील ११३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे यंदा दहावे वर्ष असून, गेल्या दशकभरापासून सण-उत्सवाच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याचे काम प्रतिष्ठानतर्फे केले जात आहे.

गणेशोत्सवातील खर्चाला सामाजिक कार्याची दिशा देण्याच्या उद्देशाने ‘एक दुर्वा समर्पण’ उपक्रम सुरू करण्यात आला. दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जाते. यंदा सांगवी येथील दोन्ही शाळांमधील ११३ विद्यार्थ्यांना पाटी, पेन्सिल, वह्या, पेन, पट्टी, रंगपेटी, खोडरबर तसेच बालमित्र पुस्तक आदी साहित्य गणेश स्थापनेच्या दिवशी देण्यात आले.

कार्यक्रमात मान्यवरांनी सण-उत्सव साजरे करताना सामाजिक बांधिलकी जपण्याची गरज व्यक्त केली. उत्सवाच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांसाठी काही करता येते, हा विचार अधिक व्यापक होण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. ‘एक दुर्वा समर्पण’च्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून शिक्षण क्षेत्रातील गरजूंना मदत करण्याचे सातत्यपूर्ण काम होत असल्याचेही मान्यवरांनी नमूद केले.

या वेळी भालोद हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक डी. व्ही. चौधरी, माजी पंचायत समिती उपसभापती योगेश भंगाळे,
श्री कृष्ण कन्स्ट्रक्शनचे संचालक स्वप्निल जावळे, अतुल फिरके, माजी ग्रामपंचायत सदस्य शशिकांत मेघे, केंद्रप्रमुख एम. एच. तडवी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी निकिताताई कोळी व मुस्तफा तडवी, अध्यक्ष जयश्री तायडे, युनिसेफचे सुबोध तायडे, भूषण धांडे, जयंत बोरोले, उल्हास वायकोळे, शरद तायडे आदी उपस्थित होते.

प्रकल्प प्रमुख अमितकुमार पाटील यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाची भूमिका स्पष्ट केली. प्रकल्प सह-समन्वयक ललित महाजन यांनी अंतर्नाद प्रतिष्ठानच्या कार्याचा परिचय करून दिला. समाधान जाधव यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रकल्प समन्वयक उमेश फिरके यांनी आभार मानले.

‘एक दुर्वा समर्पण’ उपक्रमाला यंदा दहा वर्षे पूर्ण झाली असून, या काळात विविध ठिकाणच्या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. सण-उत्सवातील खर्चातील काही भाग सामाजिक कार्यासाठी वापरण्याचा संदेश देत हा उपक्रम दरवर्षी राबविला जात आहे.

उपक्रमाच्या आयोजनासाठी ज्ञानेश्वर घुले, योगेश इंगळे, प्रसन्ना बोरोले, प्रदीप सोनवणे, विक्रांत चौधरी, शैलेंद्र महाजन, कुंदन वायकोळे, जीवन महाजन, मुख्याध्यापिका सुवर्णा कवितके, अतुल चौधरी, शिक्षिका चारूलता बऱ्हाटे, सलिमा तडवी, कपिल धांडे, केतन महाजन, विपीन वारके, योगेश साळुंके, शर्वरी पाटील, सहर्ष पाटील, तसेच अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!