भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

सावदा रेल्वे लाईन वर धडक लागून मयत झालेल्या पुरुषाची ओळख पटविण्याचे आवाहन

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातील सावदा रेल्वे लाईन वर रेल्वेची धडक लागून मयत झालेल्या 35 ते 40 वयोगटातील अनोळखी पुरुष जातीच्या व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन सावदा पोलिस स्टेशन कडून करण्यात आले आहे.

रंगाने सावळा, शरीराने सडपातळ उंची 167 सें.मी. अंदाजे अंगात पिवळे व राखाडी रंगाचा चौकडी असलेला फुल शर्ट, त्याचे आत राखाडी रंगाचा बनियान, कमरेस फिकक्ट निळे व राखाडी रंगाची पॅण्ट, पायात चप्पल नाही असा असलेला सुमारे 35 ते 40 वयोगटातील अशा वर्णनाचा पुरुष जातीचा अनोळखी पुरुष व्यक्ती दिनाक 22 ऑगस्ट 2025 रोजी 7 ते 7.15 वाजेच्या पूर्वी रेल्वे खंबा अप रेल्वे लाईन खंबा क्रमांक 458/01 ते 458/05 चे दरम्यान सावदा पोलिस स्टेशन हद्दीत गाते गाव शिवार सावदा ता. रावेर येथे रेल्वे ट्रॅकच्या बाजूला रेल्वेस धडक लागुन डोक्यास व डावे पायास गंभीर मार लागून मयत अवस्थेत मिळून आलेला आहे.

सदरील वरील वर्णनाच्या व्यक्तीला कोणी ओळखत असेल तर त्यांनी सावदा पोलीस स्टेशन फोन नं. (02584) 222043, तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल एन. गर्जे. मो.नं. 9284161882 प्रभारी अधिकारी सपोनि श्री विशाल पाटील शो.- 9850449461 यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!