वाहतूक पोलिसांवर कोयता उगारून हल्ला करण्याचा प्रयत्न
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव वाहतूक शाखेच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांशी शहरातील बेंडाळे चौकातील राणी लक्ष्मीबाई पुतळ्याजवळ २१ जून शनिवार रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास हुज्जत घालून, शासकीय कामात अडथळा निर्माण करत, पाच जणांनी लोखंडी कोयता आणि साखळीने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी शनी पेठ पोलीस स्टेशनला या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, शहर वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर कोळी आणि त्यांचे सहकारी दिनांक २१ जून शनिवार रोजी सकाळी जळगाव शहरातील बेंडाळे चौकातील राणी लक्ष्मीबाई पुतळ्याजवळ शहर वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर कोळी आणि त्यांचे सहकारी आपल्या शासकीय कर्तव्यानुसार कारवाई करत असताना, अल्ताफ अहमद अब्दुल गफूर (वय ६४), मुजम्मिल अहमद अल्ताफ अहमद रंगरेज (वय ३०), जुबेर अहमद अल्ताफ अहमद रंगरेज (वय ३८, तिघे रा. बालाजी पेठ जळगाव), अरुण रामदास टिलोरे (वय ६७, रा. समता नगर) आणि आदिल बेग शरीफ बेग (वय २७, रा. रामनगर) या पाच जणांनी पोलीस कर्मचाऱ्यांशी वाद घालत पोलिसांना अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर एका आरोपीने आपल्या मोटरसायकल क्रमांक एमएच १९ बीएन ००७८
च्या डिक्कीतून धारदार लोखंडी कोयता आणि लोखंडी साखळी बाहेर काढून ज्ञानेश्वर कोळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर धावून येत धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा आणल्याने या संदर्भात पोलीस कॉ. ज्ञानेश्वर कोळी यांनी या संदर्भात शनी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार, अल्ताफ अहमद अब्दुल गफूर (वय ६४), मुजम्मिल अहमद अल्ताफ अहमद रंगरेज (वय ३०), जुबेर अहमद अल्ताफ अहमद रंगरेज (वय ३८, तिघे रा. बालाजी पेठ जळगाव), अरुण रामदास टिलोरे (वय ६७, रा. समता नगर) आणि आदिल बेग शरीफ बेग (वय २७, रा. रामनगर) या पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले हे पुढील तपास करीत आहेत.

