महाराष्ट्रसामाजिक

न्हाव्याची भन्नाट ऑफर…’मतदार राजा जागा हो.. लोकशाहीचा धागा हो’…”बोटाला शाई दाखवा,अन्…”

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l मतदारांनी मतदान कारण आपला हक्क बजावावा या साठी शासन स्तरावर वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.त्यातच “मतदार राजा जागा हो.. लोकशाहीचा धागा हो”… या शासनाच्या हाकेला हाक देत मतदाराने मतदान करावं म्हणून “बोटाला शाई दाखवा, मोफत कटींग करा” अशी भन्नाट ऑफर एका न्हाव्यान दिली आहे

आज लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्रातील ८ मतदारसंघात मतदान पार पडल. मतदारांनी आपलं मतदान करून आपला हक्क बजावावा, मतदानाची टक्केवारी वाढवावी, यासाठी निवडणूक आयोगाकडून सातत्याने जनजागृती सुरू असते.

अशातच आता अकोल्याच्या एका न्हाव्याची भन्नाट ऑफरने सर्वांचं लक्ष वेधून घेतले . बोटाला शाई दाखवा, मोफत कटींग करा, अशी ऑफर अकोल्यातील केशकर्तनालयात पाहायला मिळाली. अकोला शहराच्या रामदास पेठ येथे अनंत कौलकार यांचे हेअर सलूनचे दुकान आहे. त्यांच्या हेअर सलूनमध्ये मतदार जनजागृती अभियान राबवले गेले आहे. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो…असे घोषवाक्य देखील त्यांच्या सलूनमध्ये लावण्यात आले आहे. सर्वसामान्यांनी आपला खारीचा वाटा उचलावा, त्यांनी मतदान करुन येणाऱ्यांची मोफत कटींग सुरु केली. त्याला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे अनंत कौलकार यांनी सांगितले.या बाबत सर्वत्र मोठी चर्चा सुरू आहे.व कौतुकही केलं जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!