भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळ

बिग ब्रेकिंग : जिल्ह्यात राजकीय भूकंप ; अखेर भुसावळ नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र अवैध…

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्यातील बहुचर्चित भुसावळ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष गायत्री चेतन भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले असून जळगाव जात पडताळणी समितीने हा निकाल दिल्यानंतर भुसावळ मध्येच नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खडबड उडालेली आहे.


राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी सौ रजनी संजय सावकारे यांचा पराभव करून गायत्री भंगाळे या विजयी झालेल्या होत्या. भुसावळ नगरपालिकेतील लोकनियुक्त नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव होते. आणि गायत्री भंगाळे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर विजय झाल्या असून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करून निवडून आलेल्या आहेत.
निवडणूक शपथपत्रांसोबत त्यांनी अनुसूचित जमाती प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र सादर केलेले होते. भुसावळचे प्रांताधिकारी यांनी हे प्रमाणपत्र जारी केलेले असून त्या प्रमाणपत्राच्या संदर्भात तक्रार देखील करण्यात आलेली होती. सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते त्यानुसार गायत्री भंगाळे यांनी जात वैधता समितीकडे हे प्रमाणपत्र साधन सादर करणे बंधनकारक होते. तथापि मुदत उलटणे आधीच त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा निर्णय देण्यात आलेला आहे.


प्रमोद सावकारे ,रजनी सावकारे ,संजय तायडे तसेच राहुल तायडे यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आलेली आहे. जळगाव येथील जात पडताळणी समितीच्या अध्यक्षांना बोदरडे, सदस्य एन एस रावते आणि एस एस महाजन यांच्या समितीने हे जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!