भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

अमळनेरक्राईमजळगाव

शिक्षण क्षेत्रात खळबळ : विद्यार्थिनीशी गैरवर्तन, प्राध्यापकावर अदखलपात्र गुन्हा

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव जिल्ह्यातील एका महाविद्यालयातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला. महाविद्यालयातील प्राध्यापकावर विद्यार्थिनींच्या छेडछाडीचे आणि गैरवर्तनाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ही संतापजनक घटना अमळनेर शहरातील एका महाविद्यालयात घडली. या घटनेने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर प्राध्यापक गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थीनींशी अश्लील गैरवर्तन करीत असल्याचा आरोप करण्यात आला असून हा प्राध्यापक विद्यार्थिनींचे लैंगिक शोषणही  करत असल्याचाही गंभीर आरोप आहे. या बाबत मोठी चर्चा शहरात एकायाला मिळत आहे. विशेष म्हणजे, २००८ पासून या प्राध्यापकाविरोधात तक्रारी दाखल होत होत्या. मात्र, संबंधित शैक्षणिक संस्थेने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

२३ एप्रिल रोजी अशाच प्रकारच्या एका प्रकरणात या प्राध्यापकावर अमळनेर पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविद्यालयातील विद्यार्थिनींची छेडछाड केल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्राचार्यांनी या प्राध्यापकास तंबी दिली व याचा राग येऊन त्याने प्राचार्यांच्या पत्नीच्या माध्यमातून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार २००८ पासून सुरु असल्याचे सांगितले जात असून या प्राध्यापकाच्या विरोधात वाढत्या छेडखानी तसेच विद्यार्थिनींच्या या मजबूरीचा फायदा घेण्याचे प्रमाण वाढत गेल्याने ही तक्रार दाखल करण्यात आली आणि त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

ही घटना उघडकीस आल्याने विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता पोलिस तपास करीत आहेत. या प्रकरणातील आरोप गंभीर असल्यामुळे आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!