भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

मोठी बातमी : फैजपूरचे माजी नगराध्यक्ष नीलेश राणे यांना सर्व शासकीय कार्यालयात प्रवेश बंदी ! “हा निर्णय लोकशाहीला मारक” – निलेश राणे

फैजपूर, ता. यावल. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | फैजपूर येथील प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्या दालनात फैजपूर येथील माजी नगराध्यक्ष निलेश उर्फ पिंटू राणे यांनी दिनांक १६ जुलै बुधवार रोजी रोजी असभ्य वर्तन केले होते. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती.या घटनेचे पडसाद संपूर्ण परिसरात उमटले होते.तसेच या घटनेच्या एक दिवस आधी १५ जुलै ला सुद्धा त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी यांचे दालनात सुद्धा असेच व्हिडिओ चित्रण केल्याचा प्रकार केला होता. या घटनेने फैजपूर सह यावल तालुक्यात याच्या विरोधात महसूल कर्मचाऱ्यांनी आंदोलन देखील केले होते. या सर्व प्रकारांच्या विरोधात महसूल कर्मचारी संघटनांनी प्रांताधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत राणे यांचेवर कार्यवाही करण्याची मागणी केली होती.
निलेश उर्फ पिंटू राणे यांना जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय मुख्यालये यावल आणि रावेर तालुक्यांमधील शासकीय कार्यालयात प्रवेश बंदी घालण्यात आली असून जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. हा निर्णय लोकशाहीला मारक असल्याचे माजी नगराध्यक्ष पिंटू राणे यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या आदेशा नुसार
निलेश मुरलीधर राणे रा. फैजपूर यांना जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय मुख्यालये आणि रावेर व यावल तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये दिनांक १९ जुलै ते १६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत प्रवेश करण्यापासून बंदी घातली आहे.

या कालावधीत ते कोणत्याही तक्रारी ऑनलाईन या प्रकारात करू शकतात. तसेच कोणत्याही सुनावणीस ते दूरभाष प्रणालीद्वारे उपस्थित राहू शकतात. तर, या कालावधीत ते कोणत्या निवडणुकीला उभे राहणार असतील तर त्यांना एक तासाची मुभा देण्यात येणार असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. हे आदेश प्रभारी अपर जिल्हाधिकारी जयश्री माळी यांनी काढले असून त्यांची यावर स्वाक्षरी आहे.

दरम्यान या संदर्भात मंडे टु मंडे न्युज ने निलेश उर्फ पिंटू राणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की , हा संविधानाच्या विरोधात निर्णय आहे. प्रशासनाचा हा निर्णय लोकशहीला मारक निर्णय दिलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी, सर्वांना अधिकार दिलेला आहे अधिकाऱ्यांना प्रश्न विचारण्याचा. मी जनतेचा लोक प्रतिनीधी आहे.मला अनेक कामांसाठी शासकीय कार्यालयात जावेच लागते. यावल तहसीलदार यांना गौणखानिज  चोरी प्रकरणी १ कोटी ४० लाख रुपये प्रकरणी मी निलंबनाची मागणी केली आहे . त्या मुळे हे प्रकरण दबाव आणून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.कर्मचाऱ्यांचे आंदोलन हे अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न आहे. या बाबत मी न्यायालयात दाद मागणार असल्याचे निलेश उर्फ पिंटू राणे यांनी मंडे टु मंडे न्युज शी बोलताना सांगितले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!