भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावमहाराष्ट्र

“हनी ट्रॅप” चे धागेदोरे जळगाव पर्यंत, मुंबई मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विधिमंडळात पेन ड्राईव्ह सादर करत नाशिक हनी ट्रॅप मध्ये सुमारे ७२ जण अडकल्याचा आरोप केला यात काही अधिकारी व लोकप्रतिनिधींचा समावेश असल्याचे म्हटले आहे. या मुळे राज्यात हानी ट्रॅप चे प्रकरण चर्चेत आले. हनी ट्रॅप प्रकरणाची राज्यात चर्चा सुरू असताना हनी ट्रॅप चे धागेदोरे जळगाव जिल्ह्या पर्यंत पोहोचले असल्याचेही समोर आले.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर मधील प्रफुल्ल लोढावर हनी ट्रॅप प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रफुल्ल लोढा यास अटकही करण्यात आली आहे. त्या संदर्भात जळगाव जामनेर व पहूर या ठिकाणी प्रफुल्ल लोढा यांच्या मालमत्तेची तपासणी करण्यात आली.

नोकरीचे आमिष देऊन अल्पवयीन १६ वर्षीय मुलगी व तिची मैत्रीण वर अत्याचार करत छायाचित्र काढत प्रसारित करण्याची धमकी व मुलींना डांबून ठेवल्याचे प्रकरणी
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातल्या पहूर येथील मूळ रहिवासी प्रफुल्ल लोढा वय ६२ वर्ष. याच्यावर मुंबईत साकीनाका पोलीस स्टेशन ला ३ जुलै रोजी तर अंधेरी एमआयडीसी पोलीस स्टेशन ला १४ जुलै रोजी पोस्को, बलात्कार, खंडणी व हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल करून ५ जुलै रोजी प्रफुल्ल लोढा याला अटक केली आहे.

त्या नंतर प्रफुल्ल लोढाच्या जळगाव जामनेर आणि पहूर या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून लोढाच्या मालमत्तेची झाडाझडती घेतली. यात जामनेर मध्ये असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्ससह पहुर मधील घराची ही झाडाझडती घेऊन कागदपत्र तपासण्यात आली. या छाप्यात पोलिसांनी एक लॅपटॉप, दोन पेन ड्राईव्ह आणि काही इलेक्ट्रॉनिक डिवाइस जप्त केले असून यातून अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात असून लवकराची याची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!