भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

थोरगव्हाण येथे झिरो एनर्जी कूल चेंबरचे प्रात्यक्षिक यशस्वी

बलवाड़ी, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज. आशीष चौधरी | थोरगव्हाण .ता. रावेर, जि. जळगाव. येथे डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथील कृषीदूतांनी झिरो एनर्जी कूल चेंबर या विषयावर प्रात्यक्षिक आयोजित केले. हे प्रात्यक्षिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे सर, प्रा. बी. एम. गोणशेटवाड सर व प्रा. व्ही. एस. पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.


या उपक्रमात कृषीदूत दिनेश दिलीप महाजन, जयेश विठोबा माळी, पवन अरुण पाटील, प्रणव शंकर पाटील आणि शिवराज सदाशिव शेळावे यांनी पुढाकार घेऊन सहभाग घेतला.प्रात्यक्षिकामध्ये झिरो एनर्जी कूल चेंबरची संकल्पना, बांधकामाची पद्धत, कार्यपद्धती तसेच त्याचा शेतकऱ्यांना होणारा फायदा याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विजेचा वापर न करता, फळे व भाज्यांचे ताजेपण काही दिवस टिकवण्याचे हे उत्तम व पर्यावरणपूरक साधन असल्याचे कृषीदूतांनी समजावून सांगितले. गावातील नागरिकांनी या प्रात्यक्षिकाला चांगला प्रतिसाद दिला व कृषीदूतांच्या उपक्रमाचे कौतुक केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!