रावेर तालुक्यातील सरपंच पदासाठी ८२ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर, ४२ ग्रामपंचायतींवर महिला राज
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण फैजपूर उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे यांच्या उपस्थितीत दुपारी ४ वाजता काढण्यात आले. या सोडतीत ४२ ग्रामपंचायतींमध्ये महिला राज राहणार आहे .
आज मंगळवार दिनांक ८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता रावेर तहसील कार्यालयात तहसीलदार बी.ए. कापसे यांच्या उपस्थितीत ८२ ग्रामपंचायतींचे प्रवर्गनिहाय आरक्षण काढण्यात आले. त्यानंतर दुपारी ४ वाजता फैजपूर उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे यांच्या उपस्थितीत तहसीलदार बी ए कापसे निवासी नायब तहसीलदार संजय तायडे ,नायब तहसीलदार भूषण कांबळे यांनी महिला आरक्षण सोडत काढली. आरक्षण सोडत वेळी सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी ग्रामपंचायत सरपंच सदस्य पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामपंचायतनिहाय आरक्षण तपशील (महिला आरक्षणासह):
अनुसूचित जाती (पुरुष) : पाडळे खुर्द, खिरोदा प्रा. रावेर, वाघोडे खुर्द, गौखेडा, मस्कावद बु., मांगी चुनवडे.
अनुसूचित जाती (महिला): विवरे खुर्द, कुंभारखेडा, सावखेडा बु., धामोडी, कळमोडे, खानापूर मुंजाळवाडी.
अनुसूचित जमाती (पुरुष) : मस्कावदसीम, निरूळ, नेहेते, पुनखेडा, सुदगाव.
अनुसूचित जमाती (स्त्री): चिनावल, भोर, दोधे, थेरोळे, वाघोड, कोचूर बु.
नाम (पुरुष): वाघोदा बु., कर्जड, थोरगव्हाण, सिंगत, खिर्डी बु., वाघाडी, सुनोडे, विवरे बु., अजंदे, विवरे बु., दसनूर, बलवडी.
नामाप्र (महिला) रणगाव, रमजीपूर, आंदलवाडी, अहिरवाडी, उटखेडा, खिर्डी खुर्द, अजनाड, निंभोरा बु., धुरखेडा, तासखेडा, गौरखेडा-
सर्वसाधारण (महिला) कोचूर खुर्द, उदळी खुर्द, निंबोल, भोकरी, मस्कावद खुर्द, रझोदा, रायपूर, शिंगाडी, गाते, विटवे, शिंदखेडा, बक्षीपूर, मोरगाव बु., कोळदे, ऐनपुर, पुरी, गोलवडे, वडगाव, सावखेडा खुर्द
सर्वसाधारण (पुरुष): भातखेडा, खिरोदा प्र. यावल, रसलपूर, केहऱ्हाळे खु., नांदुरखेडा, केहऱ्हाळे बु., उदळी बु., तांदलवाडी, तामसवाडी, मोरगाव खु., खिरवड, अटवाडे, पातोंडी, मांगलवाडी, सुलवाडी, रेंभोटा, निंभोरा सिम, कांडवेल
या सोडतीत ४२ सरपंच पदाच्या जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या मुळे या ग्रामपंचायतींवर महिला राज राहणार आहे. त्या मुळे तालुक्यातील ग्रामपंचायतींची निवडणुकीसाठी भविष्यातील दिशा स्पष्ट झाली आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
