भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमबोदवळ

बोदवड : पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

बोदवड, ता. ३०. मंडे टु मंडे न्युज | जळगाव जिल्ह्यातील पंचायत समिती बोदवड येथे कार्यरत असलेल्या एका कनिष्ठ सहाय्यकाला ६०० रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले. उमेश श्यामकांत सपकाळे असे कारवाई करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे पंचायत समिती परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, मानधन तत्त्वावरील कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या मोबदल्यात आरोपी उमेश सपकाळे याने तक्रारदाराकडे ६०० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाच देण्यास नकार देत तक्रारदाराने याबाबत जळगाव एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीने गुरुवारी (ता. ३०) सापळा रचला. सापळा कारवाईदरम्यान आरोपी उमेश सपकाळे याला ६०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली.


ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, बाळू मराठे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास जळगाव एसीबीकडून केला जात आहे. या कारवाईमुळे शासकीय कार्यालयांमध्ये लाचखोरीच्या प्रकारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, परिसरात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!