भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

ब्रेकिंग : जळगावात मोठी कारवाई; ६४.४४ ग्रॅम एमडीसह आरोपी जेरबंद, २.१३ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव.मंडे टु मंडे न्युज || अंमली पदार्थांची तस्करी व विक्रीविरोधात सुरू असलेल्या ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी कारवाई केली. पालधी-तरसोद बायपासलगत कचरा फॅक्टरी परिसरात सापळा रचून पोलिसांनी ६४.४४ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) अंमली पदार्थासह एका संशयिताला ताब्यात घेतले. या कारवाईत एमडी व मोबाईल असा एकूण २ लाख १३ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील पालधी-तरसोद बायपासजवळील कचरा फॅक्टरी परिसरात अजय बिरजू गांघे (रा. तांबापुरा कंजरवाडा, मेहरुण, जळगाव) हा एमडी ड्रग्ज विक्रीच्या उद्देशाने बाळगून आहे.

माहितीची खातरजमा केल्यानंतर एलसीबीच्या पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचला. संशयिताला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे १ लाख ९३ हजार ३२० रुपये किमतीचे ६४.४४ ग्रॅम एमडी ड्रग्ज तसेच २० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन आढळून आला. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. २९५/२०२६ नुसार एनडीपीएस कायद्यातील कलम ८(क) व २२(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अजय गांघे याच्याविरुद्ध यापूर्वी एमडी ड्रग्ज व गांजा बाळगणे व विक्री करणे तसेच घरफोडीसह एकूण ३५ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाशी संबंधित आणखी दोन संशयित तसेच साक्षीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस निरीक्षक शंतनू पाटील, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, विजय देवराम पाटील तसेच अंमलदार अक्रम शेख, किशोर पाटील, प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, रवींद्र कापडणे, गोपाळ पाटील, प्रदीप सपकाळे, राहुल रगडे, छगन तायडे आणि तांत्रिक मदतीतील मिलिंद जाधव, गौरव पाटील यांच्या पथकाने केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!