ब्रेकिंग : जळगाव पोलिस मुख्यालयातील दोन महिला सहाय्यक फौजदारांचे निलंबन, पोलिस दलात मोठी खळबळ
जळगाव, मंडे टु मंडे न्युज | जळगाव जिल्ह्यातील पोलिस दलातून एक मोठी बातमी समोर आली असून जळगाव पोलिस दलातील दोन सहाय्यक फौजदारांचे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी निलंबन केल्याने पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. गीता हरिशंकर कश्यप आणि श्रद्धा वसंतराव रामोशी अशी निलंबित सहायक फौजदारांची नावे आहेत. हजेरी मास्तरांशी गैरवर्तन केल्याच्या आरोपातून त्यांचे निलंबन करण्यात आले. पोलिस दलातील शिस्तभंगाचे हे प्रकरण गंभीर मानत जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या संदर्भातील आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस मुख्यालयाचे राखीव पोलिस निरीक्षक प्रशांत सुगरवार यांनी या संदर्भात दोन्ही महिला कर्मचाऱ्यांविरोधात स्वतंत्र कसुरी अहवाल तयार करून तो पोलिस अधीक्षकांकडे सादर केला होता.त्यानुसार, १६ जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास गीता कश्यप यांनी हजेरी मास्तर संभाजी पाटील यांच्याशी पोलिस अधीक्षकांना
”माझे इन्क्रिमेंट (वेतनवाढ) थांबविल्याचे अहवाल पाठविल्याचे सांगत शाब्दिक वाद घालत अशोभनीय वर्तन करीत मुख्यालयात गोंधळ घातला होता.
या घटनेनंतर लागलीच अवघ्या दुसऱ्याच दिवशी, १७ जुलै रोजी सकाळी सुमारे ११ वाजता दुसऱ्या सहायक फौजदार श्रद्धा वसंतराव रामोशी यांनी सकाळी अकराच्या सुमारास मुख्यालयात हजेरी मास्तर संभाजी पाटील यांना गाठून पोलिस अधीक्षकांना अहवाल पाठविल्यावरून वाद घातला व गैरव्यवहाराचे आरोप केले व गोंधळ घातला.
या दोन्ही प्रकरणांचा पोलिस निरीक्षक प्रशांत सुगरवार यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना अहवाल सादर केला. पोलिस अधीक्षकांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत दोघा महिला कर्मचाऱ्यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. दोन्ही महिला सहायक फौजदारांच्या निलंबनाचे आदेश मुख्यालयात पोहोचताच या कारवाईची फौजदारांच्या निलंबनाचे आदेश मुख्यालयात पोहोचताच या कारवाई ने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली.


